बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला मिळणे काळाची गरज - सागर देशमुख - vyakti ki walli
येत्या १४ एप्रिलपासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी सागरने विशेष तयारी केली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला मिळणे काळाची गरज - सागर देशमुख
मुंबई - संपूर्ण मानवजातीला समानतेची शिकवण देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आता लवकरच छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत त्यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. अभिनेता सागर देशमुख या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारत आहे.
अलिकडेच या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण मुंबईत पार पडले. यावेळी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी विराज मुळे यांनी त्याच्याशी संवाद साधला...