अभिनेता सागर देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने ‘भाई व्यक्ती की वल्ली’, ‘हंटर’ अशा चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सागर आता मोहित टाकळकर यांच्या ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार असून विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हंटर’, ‘वाय झेड’ आणि ‘गर्लफ्रेंड’ नंतर सागरचा सई सोबत हा चौथा चित्रपट आहे.
याबद्दल विधि कासलीवाल म्हणाल्या, "होय, सागर ‘मीडियम स्पाइसी’ चा भाग असून याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.’’