मुंबई - दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ९० च्या दशकात गाजलेल्या 'सडक' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पुजा भट्ट, संजय दत्त हे कलाकार दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तदेखील ठरला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
महेश भट्ट यांच्या 'सडक-२'ला मिळाली रिलीज डेट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - aditya roy kapoor
या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पुजा भट्ट, संजय दत्त हे कलाकार दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता.
महेश भट्ट यांच्या 'सडक-२'ला मिळाली रिलीज डेट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
१० जुलै २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी शूटिंगचा एक फोटो शेअर करून चित्रीकरणाला सुरूवात झाल्याचे सांगितले होते. आलिया पहिल्यांदाच तिच्या वडिलांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारत आहे.
आदित्य रॉयसोबत आलियाने 'कलंक' चित्रपटात काम केले आहे. 'सडक-२' चित्रपटात ती एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तर, पुजा भट्ट ही फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे.