मुंबई - पंजाबी अभिनेता दलजीत दोसांझ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या जोडीचा अर्जुन पटियाला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोमॅन्टिक-कॉमेडी असलेल्या या चित्रपटात दलजीत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, क्रिती पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटातील 'सच्चीयां मोहोबत्तां' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात क्रिती आणि दलजीतची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.
'अर्जुन पटियाला'च्या गाण्यात दिसली दलजीत-क्रितीची रोमॅन्टिक केमेस्ट्री - social media
दलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. मोहोब्बत ऐसी की दिल मे बस जायें, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.
'अर्जुन पटीयाला'च्या गाण्यात दिसली दलजीत-क्रितीची रोमॅन्टिक केमेस्ट्री
रोहित जुगराज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार आणि दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात क्रिती आणि अर्जुन व्यतिरिक्त वरुण शर्मा हा देखील झळकणार आहे.
दलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. मोहोब्बत ऐसी की दिल मे बस जायें, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे. २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.