मुंबई - अभिनेता जितेंद्र जोशीचा छोट्या पडद्यावरील 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय ठरत आहे. या कार्यक्रमात बरेच सेलिब्रिटी सहभागी होतात. त्यांच्या आयुष्यातील रंगतदार गप्पा, आठवणी आणि किस्से प्रेक्षकांना एकायला मिळतात. त्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि संगीतकार, गायक अवधुत गुप्ते हे हजेरी लावणार आहेत. यावेळी जितेंद्र जोशीने त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.
...म्हणून 'दोन स्पेशल' कार्यक्रमात सचिन पिळगावकरांना अश्रु अनावर
सचिन यांनी आपल्या आयुष्यातील, सिनेकारकिर्दितील बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमात उलगडल्या. दरम्यान त्यांनी आपल्या वडिलांसोबतची एक आठवण यावेळी शेअर केली.
सचिन यांनी आपल्या आयुष्यातील, सिनेकारकिर्दितील बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमात उलगडल्या. दरम्यान त्यांनी आपल्या वडिलांसोबतची एक आठवण यावेळी शेअर केली. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सचिन त्यांना घेऊन रुग्णालयात गेले होते. त्यावेळी आपण सेलिब्रिटी असल्याचा त्यांना का राग आला होता, हे सांगताना ते अतिशय भावुक झाले होते. आपल्या वडिलांच्या आठवणीत त्यांना यावेळी अश्रु अनावर झाले. अवधुत गुप्ते आणि जितेंद्र जोशी देखील त्यांची ही आठवण ऐकूण भावुक झाले होते.