मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर या दोघीही 'सांड की आँख' या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट शार्प शुटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित आहे. उतारवयात शार्पशुटिंगचे प्रशिक्षण घेऊन आतंरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरलेल्या या दादींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. चित्रपटाच्या सेटवरचे काही खास फोटो तापसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'सांड की आँख'; तापसीने शेअर केले सेटवरचे फोटो - prakashi tomar
या चित्रपटात भूमी आणि तापसी पुर्णत: वेगळ्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तापसीने शेअर केलेल्या फोटोत देखील भूमी आणि तापसीचा वेगळा लूक पाहायला मिळतो.
'सांड की आँख'; तापसीने शेअर केले सेटवरचे फोटो
या चित्रपटात भूमी आणि तापसी पुर्णत: वेगळ्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तापसीने शेअर केलेल्या फोटोत देखील भूमी आणि तापसीचा वेगळा लूक पाहायला मिळतो.
विनीत कुमार हे देखील झळकणार आहेत. अनुराग कश्यप आणि तुषार हिरानंदानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.