महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

साहोच्या शूटसाठी श्रध्दा कपूर युरोपमध्ये दाखल - Shradha Kapoor

साहो चित्रपटाचे अंतिम शूट युरोपमध्ये पार पडणार आहे. यासाठी श्रध्दा कपूर रवाना झाली असून प्रभास लवकरच जाईल. अलिकडेच रिलीज झालेल्या टीझरमुळे चित्रपटाबद्दलचीउत्सुकता वाढली आहे.

श्रध्दा कपूर

By

Published : Jun 18, 2019, 8:29 PM IST

मुंबई - श्रध्दा कपूर आणि प्रभास यांचा 'साहो' हा आगामी चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटींग शेवटच्या टप्प्यात आहे. भारतातील शूटींग रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू असून यात काही स्टंट्सचे शूट होत आहे. पुढील शूटींग युरोपमध्ये होणार आहे. यासाठी प्रभास युरोपला जाण्याची तयारी करीत असून श्रध्दा तिथे पोहोचली आहे.

''साहो' चित्रपटाचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आहे. चित्रपटाचे शूटींग संपत आले असून काही गाण्यांचे काम बाकी आहे. युरोपच्या नेत्रदिपक लोकेशन्सवर हे शूटींग पार पडणार असल्याचे समजते.

श्रध्दाने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत आपला आनंद व्यक्त केलाय. 'राईज अँड शाईन, टाईम टू शूट साहो. युरोप शेड्यूल', असे तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आह

ABOUT THE AUTHOR

...view details