मुंबई- अभिनेत्री लिसा रे हिने 'साहो'च्या निर्मात्यावर चोरीचा आरोप लावला आहे. इन्स्टाग्रामवर दोन फोटो टाकत तिने पोस्ट लिहिली आहे. लिसाने म्हटलंय की, 'साहो'च्या निर्मात्यांनी आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांच्या आर्ट वर्कची कॉपी केली असून आपल्या पोस्टरवर त्याचा वापर केलाय.
लिसा रे हिने शेअर केलेल्या पोस्टरमधील एक पोस्टर आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांनी बनवलेले मुळ पोस्टर असून दुसरे पोस्टर 'साहो'चे आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, 'साहो'च्या निर्मात्यांनी सुलेमानच्या कलाकृतीची थेट चोरी केली आहे. यातील डिझाईन, आर्ट वर्क आणि रंगसंगती हेबुहुब वापरण्यात आली आहे. 'साहो'च्या पोस्टरमध्ये प्रभास आणि श्रध्दा यांचे फोटो टाकून मुळ कलाकृतीशी छेडछाड केली आहे.
लिसाने लिहिलंय, ''आपल्याला पुढे येऊन बोलले पाहिजे. या निर्मात्यांना आरसा दाखवून सांगितले पाहिजे की, हे योग्य नाही. शिलोचे मुळ पेंटींगशी छेडछाड केली गेली असून मोठ्या बजेटच्या या सिनेमात याचा वापर केला गेलाय. ही प्रेरणा नसून उघडपणे चोरी आहे. हे संपूर्ण जागत कधीच स्वीकारार्ह नाही.''