महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फर्स्ट लूकनंतर 'सायको सैय्या'चा टीजर प्रदर्शित, गाण्यात दिसली प्रभास-श्रद्धाची केमेस्ट्री - shraddha kapoor

'सायको सय्या' असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यात प्रभासचा आणि श्रद्धाचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. यावर्षी १५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फर्स्ट लूकनंतर 'सायको सैय्या'चा टीजर प्रदर्शित, गाण्याच्या टीजरमध्येही दिसली प्रभास-श्रद्धाची केमेस्ट्री

By

Published : Jul 5, 2019, 10:59 AM IST

मुंबई -बाहुबली फेम प्रभास 'साहो' चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज झालाय. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही झळकणार आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वी या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकप्रमाणेच टीजरमध्ये श्रद्धा आणि प्रभासचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.

'सायको सय्या' असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यात प्रभासचा आणि श्रद्धाचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. यावर्षी १५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याचदिवशी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्यामुळे 'साहो'ला बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळेल. तसेच या दोन चित्रपटांच्या शर्यतीत जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा चित्रपटही रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या शर्यतीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details