'बाहुबली' चित्रपटामुळे सर्व परिचित झालेल्या दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी 'आरआरआर' या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले आहे. यासाठी रामचरण, 'ज्युनियर एनटीआर' आणि अजय देवगणाला साईन केलंय. या चित्रपटाची सध्या भरपूर हवा आहे. अशातच ट्रेड विशेषज्ञ कोमल नहाटा यांनी एक ट्विट करुन सर्वांनाच चकित केलंय. त्यांच्या मते राजमौलींचा हा आगामी सिनेमा रिलीज पूर्वीच तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय करेल.
कोमल नहाटा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''एस एस राजमौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने प्रिरिलीज बिझनेसच्याबाबतीत 'बाहुबली'चा विक्रम मोडला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात २५० कोटी, कर्नाटकात ५० कोटी रुपयामध्ये याचे अधिकार विकण्यात आले आहेत. तर ओव्हरसिज हक्क ७० कोटींना विकण्यात आलेत. अशा प्रकारे दक्षिण भारत आणि ओव्हरसिज यातून तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय 'आरआरआर' रिलीज पूर्वीच करेल.''