महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

RRR Trailer: 9 डिसेंबरला रिलीज होणार RRRचा ट्रेलर, निर्मात्यांची घोषणा

RRR चित्रपटाच्या ट्रेलरची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

9 डिसेंबरला रिलीज होणार RRRचा ट्रेलर
9 डिसेंबरला रिलीज होणार RRRचा ट्रेलर

By

Published : Dec 4, 2021, 6:48 PM IST

हैदराबाद - अजय देवगण, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट आरआरआरच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, चित्रपट पुढील वर्षी 7 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर आता ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर ३ डिसेंबरला येणार होता, पण आता अज्ञात कारणांमुळे ट्रेलर रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची माहिती चित्रपटाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

RRR ची नवीन रिलीज तारीख ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आली होती. यापूर्वी, हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी अधिकृतपणे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. कोविडमुळे चित्रपट निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. आरआरआर हा एक पिरियड फिल्म आहे, ज्यामध्ये राम चरण आणि एनटीआर जूनियर सोबत अजय देवगण आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

1920 च्या बॅकड्रॉपवर आधारित चित्रपट

1920 च्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम, अल्लुरी सीतारामराजू यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात भीम ज्युनियर एनटीआरची भूमिका करत आहे आणि राम चरण सीतारामची भूमिका करत आहे. यासोबतच आलिया भट्ट, अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून आलिया भट्ट साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया देखील चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप उत्साहित होती, तिने सोशल मीडियावर अनेक वेळा पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा - सारा अली खानने माधुरी दीक्षितसोबत केला 'चका चक' डान्स, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details