हैदराबाद : RRR हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेलंगणातील प्रत्येक थिएटरमध्ये ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांचीच हवा आहे. आज ( शुक्रवारी) सकाळपासूनच एनटीआरचे चाहते ढोल-ताशे आणि फटाक्यांसह थिएटरमध्ये सज्ज होते.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया एनटीआर आणि रामचरण या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला पुन्हा वरील स्तरावर नेले आहेत, असे म्हटले आहे. आरआरआर नक्कीच बाहुबली रेकॉर्ड तोडेल. एनटीआरचे चाहते जय एनटीआर आणि जय बलैया अशा घोषणांनी परिसर दूमदूमून गेला होता.
ज्युनियर एनटीआरने पाहिला चित्रपट
दरम्यान, ज्युनियर एनटीआरने गच्चीबाऊली येथील एएमबी थिएटरमध्ये कुटुंबासह आरआरआर चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर एनटीआरने थिएटरबाहेर चाहत्यांना अभिवादन केले. याचबरोबर इतर नायक रामचरणने त्याची पत्नी उपासनासोबत भ्रमरंभ थिएटरमध्ये RRR चित्रपट पाहिला. चित्रपट पाहताना उपासनाने धमाल मस्ती केली.चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि निर्माते दानय्या यांनीही चित्रपटगृहात प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहिला होता.
हेही वाचा -Vivek Agnihotri Controversial Statement : 'भोपाळी म्हणजे समलैंगिक'.. विवेक अग्निहोत्रींचं वादग्रस्त वक्तव्य..