मुंबई- अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या पती गौतम किचलूसोबत मालदीवमध्ये हनीमून साजरी करत आहे. असे असले तरी सुट्टीवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करीत आहे.
अलीकडेच काजल अग्रवालने गौतमसोबतचे काही फोटो शेअर केली आहेत. ज्यात ती समुद्रामध्ये त्याच्याबरोबर एन्जॉय करताना आणि पोहताना दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
हेही वाचा - फार्म हाऊसवर गुरे चरायला घेऊन गेले धर्मेंद्र, व्हिडिओ चर्चेत
एका फोटोत काजल पती गौतम किचलूचा हात धरत समुद्रात तरंगताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा अंदाज खरोखर अप्रतिम दिसत आहे. आपल्याला निळा समुद्र खूप आवडतो असे तिने फोटोसोबत लिहिले आहे. याशिवाय काजलने आपल्या पतीसोबत अनेक फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती समुद्रात पोज देताना दिसत आहे. काजल अग्रवालच्या फोटोचे कौतुक करताना चाहते थकलेले नाहीत.
हेही वाचा - आराध्या बच्चन 'जय सिया राम' भजन गातानाचा व्हिडिओ व्हायरल
काही दिवसापूर्वी पार पडलेल्या काजल अग्रवाल आणि गौतम किचलूच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. संपूर्ण विवाह सोहळा मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. काजल आणि गौमतच्या लग्नाशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.