मुंबई -दिग्दर्शक रोहित शेट्टीने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. २०१३ साली शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा रोहितने व्यक्त केली आहे. जर, या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यात आला, तर यामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील, याचीही हिंट त्याने दिली आहे.
एका माध्यमाच्या मुलाखतीत रोहितला 'चेन्नई एक्सप्रेस'च्या सिक्वेलबाबत प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी मुख्य भूमिकेत घेण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा -अमेरिकेतील लाईव्ह शो सलमानने केला रद्द, जाणून घ्या कारण?...
सारा आणि कार्तिक यांचा पहिला एकत्रित चित्रपट 'लव्ह आज कल' अजून प्रदर्शित झाला नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे दोघांची जोडी 'चेन्नई एक्सप्रेस'च्या सिक्वेलमध्ये असावी, अशी इच्छा रोहितने व्यक्त केली.