मुंबई -अभिनेता अजय देवगनचे वडील आणि सुप्रसिद्ध स्ंटटमॅन अशी ओळख असलेले वीरू देवगन यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकारांना चांगलाच धक्का बसला. वीरू देवगन यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी अजय देवगनच्या घरी भेट दिली. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांची मैत्री देखील सर्वपरिचीत आहे. रोहित शेट्टी वीरू देवगन यांना त्याचे वडील, गरू मानत होता. त्यांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
'वीरू देवगन यांनी त्यांच्या मुलांचे रुपांतर हिरोमध्ये केले आहे. अगदी वयाच्या १६ व्या वर्षापासून केलेला त्यांचा स्टंट हा वयाच्या ४५ व्या वर्षीही तेवढ्याच ताकदीचा असायचा. एकच अशी व्यक्ती आहे, जी स्वर्गातूनही माझ्यावर गर्व करतील. माझे गुरू, माझे वडील - वीरू देवगन', असे रोहितने त्याच्या इन्स्टापोस्टमध्ये लिहिले आहे.