हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे. सैरा नरसिम्हा रेड्डी असे या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.
आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे.