मुंबई - माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजनी त्यांना श्रध्दांजली वाहीली आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिलाय. विशेष म्हणजे तो आणि त्याची पत्नी जेनेलिया यांना सुषमा स्वराज सिनेमाच्या सेटवर भेटल्या होत्या.
सुषमा स्वराज यांनी सेटवरच दिला होता आशिर्वाद, रितेश देशमुखने जागवल्या आठवणी - रितेश देशमुख
रितेश देशमुख यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणीला उजाळा दिलाय. तो आणि त्याची पत्नी जेनेलिया यांना सुषमा स्वराज सिनेमाच्या सेटवर भेटल्या होत्या. रितेश आणि जेनेलियांनी त्यांचा आशिर्वाद घेतला होता.
रितेश देशमुखने एक ट्विट शेअर करीत सुषमा स्वराज यांच्या भेटीचा प्रसंग लिहिलाय. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटचाचे शूटींग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत सुरू होते. या चित्रपटाचे निर्माते रामोजी राव होते. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट होता. या सेटवर तत्कालिन माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी भेट दिली होती.
सेटवर सुषमा स्वराज आल्या आणि रितेश आणि जेनेलियांना त्या भेटल्या. तेव्हा रितेशचे वडिल विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेश आणि जेनेलियांनी त्यांचा आशिर्वाद घेतला होता. त्यांच्या निधनाने रितेश, जेनेलिया दुःखी झाले आहेत.