नांदेड - माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'आनंदाचे डोही' कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण यांची मुलाखती घेतली. त्या दरम्यान अशोक यांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर रितेश देशमुख यांनी 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या किस्स्यासह जीवनातील काही आठवणी नांदेडकरांसमोर उलगडल्या.
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी स्वतःच्या मुलाखती दरम्यान सिने अभिनेते रितेश देशमुख यांना प्रतिप्रश्न करत त्यांच्या जीवनातील शालेय ते कॉलेज जीवनातील आठवणी संदर्भात प्रश्न केला. यावेळी रितेश देशमुख बोलताना म्हणाले की, मी शालेय जीवनात मी एकाही मुलीशी बोललो नाही. 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी एका मुलीला गुलाब पाठवला होता. वीस वर्षे गेले तरी अजूनही निरोप आला नाही. म्हणताच हशा पिकला.
'तुझे मेरी कसम' या चित्रपटाची आठवण सांगताना ते म्हणाले की, मला या चित्रपटाची ऑफर आल्यानंतर मी निर्मात्याला आई-वडिलांच्या परवानगी साठी अवधी मागीतला. त्यानंतर आईशी चर्चा केली. आईने एका क्षणात होकार दिला. त्यानंतर वडील विलासराव देशमुख यांचीही परवानगी माझ्यासाठी महत्त्वाची होती. मला त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांचा कामाचा व्याप खूप मोठा असल्याने त्यांना भेटायला मुलगा असूनही मला बराच अवधी लागला.
एके दिवशी आमची भेट झाली, त्यावेळी त्यांना चित्रपटाच्या ऑफर बदल माहिती दिली. ते म्हणाले प्रोड्युसर म्हणून आली काय? त्यावेळी मी म्हणालो चित्रपटाचा अॅक्टर म्हणून आली आहे काय करू? त्यावेळी वडील म्हणाले की, तुमचा निर्णय तुम्ही घ्या असे सांगितले. त्यावेळी वडिलांना म्हटले होते की, मी एका मुख्यमंत्री यांचा मुलगा म्हणून आज माझी ओळख आहे. हा चित्रपट चालणार नाही अशीच शंभर टक्के शंका माझ्या मनात होती. हा चित्रपट पडला तर मुख्यमंत्री यांच्या मुलाला अॅकटिंग येत नाही. हा नाद कशाला करावा असे बरेच काही बोलून तुमच्या नाव खराब होईल. असे म्हटले. त्यावेळी माझ्या वडिलांनी एक वाक्य वापरले होते ते आजही मला आठवते 'मी माझ्या नावाची काळजी घेतो तू तुझ्या नावाची घे...!' असे म्हणत 'तुझे मेरी कसम' चित्रपटा दरम्यानची आठवण सांगितली.