महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रितेश-जेनेलिया जोडीचा 'मिस्टर मम्मी' चित्रपटाच्या शुटिंगला इंग्लंडमध्ये आरंभ - जेनेलिया आगामी चित्रपट

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी त्यांच्या आगामी 'मिस्टर मम्मी' या चित्रपटाच्या शूटिंगला इंग्लंडमध्ये सुरुवात केली आहे. भूषण कुमारच्या टी-सिरीजचे पाठबळ असलेला 'मिस्टर ममी' या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करीत आहेत.

रितेश-जेनेलिया जोडीचा 'मिस्टर मम्मी'
रितेश-जेनेलिया जोडीचा 'मिस्टर मम्मी'

By

Published : Mar 21, 2022, 4:49 PM IST

मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी त्यांच्या आगामी कॉमेडी-ड्रामा 'मिस्टर मम्मी' चित्रपटाच्या शूटिंगला इंग्लंडमध्ये सुरुवात केली असल्याची घोषणा निर्मात्यांनी सोमवारी केली. हा चित्रपट शाद अली दिग्दर्शित करीत असून दिग्दर्शक अली हे 'बंटी और बबली' आणि 'ओके जानू' या सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. ''मिस्टर मम्मी''ला भूषण कुमारची टी-सीरीज, कृष्ण कुमार, अली आणि शिवा अनंत यांचा पाठिंबा आहे.

"आणि प्रवास सुरू झाला. मिस्टर मम्मी आज इंग्लंडमध्ये शूटिंग फ्लोअरवर जाईल," अशी पोस्ट T-Series च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आली आहे. हा एक मिश्किल कॉमेडी चित्रपट आहे.

रितेश देशमुख आणि डिसूझा यांनी 2003 मध्ये रोमँटिक-ड्रामा 'तुझे मेरी कसम'मधून त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. या जोडीने 'मस्ती' आणि 'तेरे नाल लव हो' गया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा -इतिहासात पहिल्यांदा मराठी दिग्दर्शकाचे नाव विमानावर छापले

ABOUT THE AUTHOR

...view details