लातुर -बाभळगाव येथे सकाळी ९.३० वाजता देशमुख कुटुंबातील सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता रितेश देशमुख याने जेनेलियासोबत हजेरी लावली होती. त्यानेही यावेळी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
बाभळगावत देशमुख कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क रितेशने यावेळी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. 'पावसाचे सावट असले तरी घराबाहेर पडून मतदान करा, असं आवाहन त्याने यावेळी केलं. शिवाय लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदार संघात विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला.
हेही वाचा -अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान
परंपरेप्रमाणे यावेळी ही देशमुख कुटुंबीयांनी एकत्रित मतदान केले. यावेळी माजी मंत्री दिलीप देशमुख, वैशालिताई देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्यासह सर्वांची उपस्थिती होती.
पाऊस जरी असले तरी आता पाऊस बंद झाला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडतील, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. तर जिल्ह्यातील ६ ही मतदारसंघात चांगले वातावरण असून जनता विकासाबरोबर राहील, असा विश्वास सर्वांनी उपस्थित केला.
हेही वाचा -लातुरात मतदानाला सुरवात ; पावसाचे सावट कायम
यावेळी मतदानासाठी आलेले रितेश आणि जेनेलिया सर्वांचे आकर्षण ठरले.