मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या अप्रतिम कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता रितेश देशमुखने चाहत्यांशी एक सुंदर क्षण शेअर केला आहे. रितेशने पत्नी जेनेलिया डिसूजासोबतचा 20 वर्षे जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत हे जोडपे अगदी तरुण दिसत आहे. जेनेलियासोबतच्या नात्याला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेशने हा फोटो शेअर केला आहे.
शनिवारी रितेशने पत्नी जेनेलियासोबतचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. एक फोटो आत्ताचा आहे तर एक 20 वर्षे जुना आहे. हे फोटो शेअर करत रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''मी जे करतो त्याला प्रेम नाही ‘वेड’ म्हणतात.''
या पोस्टवर कॉमेंट देत जेनेलियानेही मराठीत लिहिले, ''जसं जसं वयं वाढलं तसं कळलं की या वेडेपणाला प्रेम म्हणतात.''
बॉलीवूड अभिनेता रितेश दशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार आहे. अलीकडेच, या जोडप्याने नुकताच लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना नवीन चित्रपटाची भेट देखील दिली.