मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला 'बागी ३' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरवर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सध्या चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान रितेश देशमुखचा मात्र नवा लुक पाहायला मिळाला. त्याचा लुक पाहून नेटकरी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउटंवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याचे केस अत्यंत कमी कापताना दिसला होता. त्यावेळी त्याने हा लुक नेमका कशासाठी केला आहे, हे सांगितले नव्हते. मात्र, आता 'बागी ३'च्या प्रमोशनवेळी त्याचा हाच लुक पाहायला मिळाला आहे.
रितेशचा हा लुक पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचा हा लुक 'गजनी' चित्रपटातील आमिर खानसारखा असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.