महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रितेश-जेनेलिया घेणार अशोक चव्हाणसह अमितांची मुलाखत - डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेण्यासाठी बॉलिवूडची सुप्रसिद्ध जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

Riteish Deshmukh and Jenelia inteview with Minister Ashok Chavan and his wife
रितेश - जेनेलिया घेणार अशोक चव्हाण आणि पत्नी अमिता यांची मुलाखत

By

Published : Feb 10, 2020, 1:54 PM IST

नांदेड -ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) 'आनंदाचे डोही' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेण्यासाठी बॉलिवूडची सुप्रसिद्ध जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा - देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबीक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे असलेले 'नाना' यांच्या हृदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमातून मिळणार आहे.

रितेश - जेनेलिया घेणार अशोक चव्हाण आणि पत्नी अमिता यांची मुलाखत

हेही वाचा -सुभाष घईंच्या 'विजेता' चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लुक पोस्टर, सुबोध भावे मुख्य भूमिकेत

या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे.

हेही वाचा - 'मीडियम स्पायसी' बनून सई ताम्हणकर-ललित प्रभाकर येणार एकत्र

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details