महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुपम खेर यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या आत्मचरित्राचे प्रकाशन - new york

अनुपम खेर यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांवर दमदार छाप पाडली. बॉलिवूडचे बरेच सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा हाच प्रवास त्यांच्या आत्मचरित्रात उलगडण्यात आला आहे.

अनुपम खेर यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या आत्मचरित्राचे प्रकाशन

By

Published : Aug 11, 2019, 2:36 PM IST

न्यूयॉर्क -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा जीवनप्रवास उलगडणारे 'लेसन्स लाइफ टॉट मी, अन्नोइंगली' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा अलीकडेच न्यूयॉर्क येथे पार पडला. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

अनुपम खेर यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांवर दमदार छाप पाडली. बॉलिवूडचे बरेच सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा हाच प्रवास त्यांच्या आत्मचरित्रात उलगडण्यात आला आहे. त्यांनी आत्तापर्यंत ५०० पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ते एक प्रेरणादायी वक्तेदेखील आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

अनुपम खेर यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या आत्मचरित्राचे प्रकाशन

अनुपम खेर हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली मतं मांडत असतात. तर, 'रीडर्स' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांशी संवाद साधणार आहेत.

बॉलिवूडमध्ये ३५ वर्षांची कारकीर्द -
अनुपम खेर यांनी १९८४ साली बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील काही खास घडामोडी देखील वाचायला मिळतील, असे त्यांनी सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details