महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रतिक्षा संपली, तब्बल एका वर्षानंतर मायेदशी परतण्यासाठी ऋषी कपूर सज्ज - नितू कपूर

ऋषी कपूर हे देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. त्यांनाही गणेशोत्सवाची ओढ होतीच. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक जूना फोटो शेअर करुन गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला होता.

प्रतिक्षा संपली, तब्बल एका वर्षानंतर मायेदशी परतण्यासाठी ऋषी कपूर सज्ज

By

Published : Sep 9, 2019, 1:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत आहेत. त्यांच्यावरील उपचार आता पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या परतण्याची आतुरता होती. चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मायदेशात परतण्यासाठी ऋषी कपूर सज्ज झाले आहेत. गणेश विसर्जनाच्या दोन दिवस आधी ते मुंबईत असतील.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषी कपूर उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला भारतात परतणार आहेत. गेल्या वर्षभरापासून ते घरापासून दुर होते. दरम्यान त्यांची बऱ्याच कलाकारांनी न्यूयॉर्क येथे जाऊन भेट घेतली. नितू कपूर यांनी त्यांच्या तब्ब्येतीचे अपडेट्स वेळोवेळी चाहत्यांना दिले.

ऋषी कपूर हे देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. त्यांनाही गणेशोत्सवाची ओढ होतीच. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक जूना फोटो शेअर करुन गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला होता.

हेही वाचा-'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ट्रेलरही लवकरच येणार भेटीला

ऋषी कपूर यांच्या कठिण काळात नितू कपूरने त्यांना वेळोवेळी आधार दिला. त्याबद्दल ऋषी कपूर यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

आता गणेश विसर्जनासाठी ऋषी कपूर मायदेशात हजर राहतील. लगेच ते कामातही सक्रिय होणार आहेत. आगामी २ चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका पाहायला मिळेल. न्युयॉर्कला रवाना होण्यापूर्वी त्यांचा 'मुल्क' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा-ओळखा पाहू कोण? गोड आवाजात गाणारी 'ही' चिमुकली आज आहे सुप्रसिद्ध मॉडेल

ABOUT THE AUTHOR

...view details