महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'थॅनोस' आणि 'स्पायडरमॅन'चा चक्क 'फर्स्ट क्लास' डान्स, ऋषी कपूर यांनी शेअर केला धमाल व्हिडिओ - first class dance

व्हिडिओत थॅनोस आणि स्पायडरमॅन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्क 'कलंक'च्या 'फर्स्ट क्लास' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी या व्हिडिओला शेअर करून त्यावर मजेदार कॅप्शनही दिले आहे.

'थॅनोस' आणि 'स्पायडरमॅन'चा चक्क 'फर्स्ट क्लास' डान्स, ऋषी कपूर यांनी शेअर केला धमाल व्हिडिओ

By

Published : May 3, 2019, 4:35 PM IST

मुंबई - 'अॅव्हेन्जर्स ऐन्डगेम' या चित्रपटाने सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूडच्या कलाकारांनाही वेड लावले आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत २६० कोटी रूपयांची कमाई केली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना देखील अॅव्हेन्जरच्या थॅनोस आणि स्पायडरमॅन यांचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या

व्हिडिओत थॅनोस आणि स्पायडरमॅन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्क 'कलंक'च्या 'फर्स्ट क्लास' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी या व्हिडिओला शेअर करून त्यावर मजेदार कॅप्शनही दिले आहे.

'अॅव्हेन्जर्स ऐन्डगेम'ने आत्तापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने रेकॉर्ड तयार केले आहेत. या चित्रपटात मार्व्हलच्या २२ चित्रपटातील सुपरहिरोंचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details