'शाब्बास तेलंगाणा पोलीस', ऋषी कपूर यांनी ट्विट करून केलं अभिनंदन - Rishi Kapoor latest news
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीदेखील पोलिसांचे अभिनंदन करत ट्विट केलं आहे.

'शाब्बास तेलंगना पोलीस', ऋषी कपूर यांनी ट्विट करून केलं अभिनंदन
मुंबई -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून या घटनेचे तिव्र पडसाद देशभरात पाहायला मिळाले होते. कलाविश्वातही या घटनेची चीड व्यक्त केली गेली. मात्र, आज सकाळी अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीदेखील पोलिसांचे अभिनंदन करत ट्विट केलं आहे.