महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रिंकू राजगुरुचा बिनधास्त अंदाज, 'मेकअप'चा ट्रेलर प्रदर्शित - Rinku Rajguru

समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी तिच्या जगण्याची दुसरी बाजू आहे.

Rinku Rajguru Starer Makeup Trailer Out
रिंकू राजगुरुचा बिनधास्त अंदाज, 'मेकअप'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jan 2, 2020, 5:35 PM IST

Updated : Jan 2, 2020, 6:29 PM IST


मुंबई - 'सैराट' चित्रपटात बिनधास्त 'आर्ची'ची भूमिका साकारल्यानंतर रिंकू राजगुरू 'कागर' चित्रपटातही दमदार भूमिकेत झळकली. आता पुन्हा एकदा 'मेकअप' चित्रपटातून तिचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच, या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. रिंकू राजगुरूचा कोणता

'मेकअप' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे. १०० टक्के बिनधास्त, १०० टक्के चुलबुली आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल असलेल्या 'पूर्वी'ची भूमिका रिंकू साकारताना दिसणार आहे. मात्र, यासोबतच तिचा बिनधास्त आणि बोल्ड लूक नेमका कशासाठी आहे, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

'मेकअप'च्या ट्रेलरमध्ये रिंकूची दुहेरी लूक असलेली भूमिका पाहायला मिळते. एकिकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसते. यासोबतच काही ट्विट्स्ट आणि वळणांची झलकही ट्रेलरमध्ये दिसते. अभिनेता चिन्मय उद्गीरकर तिच्यासोबत भूमिका साकारत आहे. त्याचाही लूक अलिकडेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. दोघांचा एकत्रीतरित्या हा पहिलाच चित्रपट असल्याने त्यांची केमेस्ट्री पाहंण रंजक ठरणार आहे.

दिग्दर्शक गणेश पंडित यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनीय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन पल मीडिया यांची निर्मिती आहे. दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गणेश पंडित दिग्दर्शित, लिखित 'मेकअप' चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी तिच्या जगण्याची दुसरी बाजू आहे. परंतू पूर्वीने हा 'मेकअप' का केला असेल, हे चित्रपट आल्यावरच कळेल.

Last Updated : Jan 2, 2020, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details