महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कागर'नंतर रिंकू राजगुरूचा रावडी अंदाज, 'मेकअप'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीजर प्रदर्शित - makeup

'सैराट', 'कागर' चित्रपटाप्रमाणेच रिंकूचा या चित्रपटातही बिनधास्त अंदाज दाखवण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटात ती बोल्ड आणि रावडी रूपात दिसणार आहे.

'कागर'नंतर रिंकू राजगुरूचा रावडी अंदाज, 'मेकअप'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीजर प्रदर्शित

By

Published : May 20, 2019, 4:18 PM IST

मुंबई - बिनधास्त, कोणालाही न घाबरणारी 'आर्ची' साकारणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. निवडणुकांच्या धामधुमीमध्ये तिचा 'कागर' चित्रपटही येऊन गेला. 'कागर'ला बॉक्स ऑफिसवर 'सैराट'प्रमाणे यश मिळाले नसले, तरीही तिच्या अभिनयाचे पुन्हा एकदा कौतुक झाले. आता तिचा 'मेकअप' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

'सैराट', 'कागर' चित्रपटाप्रमाणेच रिंकूचा या चित्रपटातही बिनधास्त अंदाज दाखवण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटात ती बोल्ड आणि रावडी रूपात दिसणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये तिच्या हातात बिअरची बाटली दिसते. तसेच खिडकीतून बाहेरच्या जगाशी ती भांडताना दिसते.

रिंकू राजगुरूच्या 'मेकअप'चा टीजर प्रदर्शित

'मेकअप' या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडीत हे करत आहेत. टीजरमध्ये फक्त रिंकूचीच झलक पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार, हे जाहीर करण्यात आलेले नाही. तिचा रावडी लूक पाहून चाहत्यांना मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता तिच्या या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details