मुंबई- ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी, सोनम आणि हर्षवर्धन कपूर यांची बहीण चित्रपट निर्माती रिया कपूर हिचे अलिकडेच विवाह पार पडला होता. तिचा दीर्घकाळचा प्रियकर करण बूलानीसोबत 14 ऑगस्ट रोजी ती बोहल्यावर चढली होती. नवविवाहित जोडपे रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसले होते. मात्र ते नेमके कुठे जात आहे याबद्दल काहीच खुलासा झाला नव्हता. आज त्यांनी हनिमुनचे फोटो पोस्ट केल्यानंतर समजले की ते मालदिवमध्ये हनिमुन साजरा करीत आहेत.
रियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर मालदिवमधील स्वीमिंग पूलमधील एक फोटो पोस्ट केलाय. यात ती निळाशार पाण्यात पाठीवर तरंगताना दिसतेय. पूलच्या मागे दूरवर निळा समुद्र मोहक दिसत आहे. रियाने ब्राऊन बिकिनी घातलेली असून हा फोटो तिच्या पतीने क्लिक केलाय. या फोटोला तिने सुंदर कॅप्शन दिलंय. तिने लिहिलंय, "मुलांना आजीच्या घरी सोडले."
आता तिने असे का लिहिलंय? असा प्रश्न पडला असेल. कारण या जोडप्याचे नुकतेच लग्न झालंय आणि त्यांना मुलं असणं शक्य नाही. मग तिने हे कॅप्शन का बरं दिलं असावं? त्याचं कारण आहे तिचा आवडता पाळीव श्वान रसेल क्रो आणि करणचा पाळीव, ज्याचं नाव आहे एलिझाबेथ लेमन यांना रियाची आई सुनिता कपूर यांच्याकडे सोडून ते हनिमुनला बाहेर पडलेत. त्यामुळे रियाने असे शीर्षक दिले आहे.