अभिनेत्री रेणूका शहाणे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपली परखड मते मांडण्यासाठी त्या कोणाचीही तमा बाळगत नाहीत. ट्विटरवर एका युजरने त्यांना दुसरे काही काम नाही का? असा सवाल विचारला होता. त्याला सडेतोड उत्तर देत रेणूकाने युजरची बोलती बंद केली आहे.
रेणूका शहाणेने ट्विटर युजरची केली बोलती बंद - Reaction on user
रेणूका शहणेला काम नाही का ? असा प्रश्न ट्विटरवर विचारला गेलाय...त्याला तिने चोख उत्तर दिलंय...काम न करणारे लोकच ट्विटरवर सक्रिय असतात का असा सवाल करीत तिने युजरची बोलती बंद केलीय...
रेणूका शहाणेने युजरला उत्तर देताना ट्विटरवर लिहिलंय, "जे ट्विट करतात त्यांना काही काम नसते असे वाटते का ? मोठे उद्योजक, वैज्ञानिक, राजकीय पक्ष, सामान्य लोक... त्यांना काम नाही म्हणून ट्विट करीत असतात का ? ट्विटर अकाऊंट उघडून गप्प बसण्यात काय अर्थ आहे, नाही का?" रेणकाच्या या सडेतोड उत्तरामुळे युजर जरी सध्या गप्प असला तरी त्याचे ट्विटर न्याहाळले तर तो पक्का भाजप समर्थक असल्याचे दिसते. त्यामुळे हा भाजपशी सहमत नसणाऱ्या कलाकारांवर टीका करण्याच्या प्रचाराचा भाग दिसतो.