मुंबई- काही दिवसांपूर्वी भारतात सोशल मीडियावर मी-टू मोहिमेचे वादळ आले होते. या माध्यमातून अनेक महिलांने आपल्यासोबत घडलेले गैरवर्तनाचे प्रकार समाजासमोर मांडले. या मोहिमेतून अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांचे खरे चेहरे जगासमोर आले. यात माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचेही नाव आहे.
तुम्ही चौकीदार तर कोणतीच महिला सुरक्षित नाही, रेणूका शहाणेंचा एम.जे.अकबरांना टोला - malang
मीटू मोहिमेअंतर्गत एम.जे अकबर यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाले होते. त्यामुळे, रेणूका शहाणेने त्यांना हा टोला लगावला
याच पार्श्वभूमीवर आता रेणूका शहाणेने अकबरांना सुनावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मै भी चौकीदार’ही नवी प्रचार मोहीम सोशल मीडियावर राबवली जात आहे. या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला. 'मै भी चौकीदार’ या माहिमेचा भाग होत असल्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. यावरच बोलत रेणूका शहाणेने म्हटले, जर तुम्हीही चौकीदार आहात तर कोणीही महिला सुरक्षित नाही.
यापूर्वी एका महिला पत्रकाराने अकबर यांच्यावर अश्लिल मेसेज आणि असभ्य कमेंट केल्याचा आरोप केला होता. तर इतरही अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.