महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सर्वकाही गमावण्याच्या' भीतीने परिवर्तनाच्या प्रवासाला चालना मिळाली - लिझेल रेमो डिसुझा - लिझेल डिसूझाचे वजन घटले

रेमो डिसूझाची पत्नी आणि निर्माती लिझेल डिसूझाचे वजन घटले आहे. शरीरात घडलेल्या या बदलाचे प्रेरणा स्त्रोत रेमोच असल्याचे तिने सांगितले. असे करण्यामध्ये तिचा स्वार्थ होता असेही ती म्हणाली.

लिझेल रेमो डिसुझा
लिझेल रेमो डिसुझा

By

Published : Sep 28, 2021, 7:58 PM IST

हैदराबाद - नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक रेमो डिसूझाची पत्नी आणि निर्माती लिझेल डिसूझा काही काळापूर्वी खूप चर्चेत आली होती. वजन घटवून स्वतःच्या शरीरात बदल घडवून आणण्यात ती यशस्वी ठरली होती. तिला तंदुरुस्त राहण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली हे सांगताना ती म्हणाली, की असे करण्यावाचून तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे स्वतःवर केंद्रीत करुन फिटनेसवर लक्ष दिले.

या महिन्याच्या सुरुवातीला, रेमोने 2018 मध्ये फिटनेसच्या प्रवासाला निघालेल्या त्याच्या पत्नीसाठीची एक पोस्ट शेअर केली होती. त्याच्या इन्स्टाग्रामवर रेमोने लिझेलच्या आधी आणि नंतरच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला होता. एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना, लिझेलने कबूल केले आहे की तिचा नवरा तिच्या परिवर्तन प्रवासात सतत प्रेरणास्त्रोत राहिला आहे. परंतु जे काही परिवर्तन घडले ते तिच्या स्वतःच्या भल्याचे होते. हा थोडा स्वार्थीपणा होता असेही तिने म्हटलंय.

"मी एका अशा टप्प्यावर पोहोचले होते की जर मी स्वतःची काळजी घेतली नाही तर मी सर्व काही गमावू शकत होते. मला वाटते की आपण स्वतःबद्दल थोडा स्वार्थी असणे आवश्यक आहे. हा एक मुद्दा होता ज्याने सर्वकाही बदलले," असे लिझेलने दैनिकाला सांगितले .

स्ट्रीट डान्सर 3 डी च्या शूटिंग शेड्यूलसाठी रेमोसोबत लंडनला जात असतानाही लिझेलने तिच्या फिटनेस पद्धतीचे पालन केले. संपूर्ण शुटिंग शेड्यूलमध्ये, ती तिच्या प्रशिक्षकाच्या संपर्कात राहिली आणि आहाराचे पालन केले. "मी स्ट्रीट डान्सरच्या शूटसाठी लंडनला गेले होते आणि प्रवीणच्या सतत संपर्कात होते, माझ्या जेवणातील पदार्थांमध्ये मी कार्ब्सपासून दूर होते. जगाला न सांगता स्वतःला 30-40 दिवस दिले पाहिजेस असे त्याने मला सांगितले होते. तुम्ही ही गोष्ट साध्य केल्याचे जगाच्या लक्षात येईल. मी लंडनमध्ये असताना गरम कपडे परिधान करीत होते त्यामुळे लोकांच्या लक्षात ही बाब आली नाही. परंतु पुढे दुबईच्या शेड्यूलमध्ये लोक बोलायला लागले की तूझे वजन घटले आहे."

वर्क फ्रंटवर रेमो डिसुझा सध्या डान्स-रिअॅलिटी शो डान्स+ च्या सीझन 6 मध्ये सुपर जज आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित आहे.

हेही वाचा - पठाण : शाहरुख, दीपिका स्पेनमध्ये प्रेक्षणीय स्थळावर करणार गाण्याचे शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details