महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ठरलं तर! या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुशांतचा 'दिल बेचारा' - sushant singh rajput

आजच्या काळातील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या 'दिल बेचारा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

दिल बेचारा

By

Published : Mar 8, 2019, 4:00 PM IST

मुंबई- आजच्या काळातील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या 'दिल बेचारा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता या चित्रपटाला रिलीज डेट मिळाली आहे. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. या चित्रपटात सुशांत सिंगसोबत अभिनेत्री संजना सांघी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'दिल बेचारा' हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फाल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.


हा चित्रपट प्रदर्शनाआधीच अनेक कारणांने चर्चेत राहिला. मीटू मोहिमेच्या काळात संजनाने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतनं आपल्यासोबत अतिजवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याचे म्हटले जात होते. मात्र, नंतर सुशांतने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत आणि संजनाची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. मुकेश छाब्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details