मुंबई - असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची सध्या बरीच उत्सुकता ताणली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार हे अगोदरच्या पोस्टरमधून सांगण्यात येत होतं. मात्र त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत.
नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे आहे. तर, सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.
अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ यंदाच्या दिवाळीत २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.