मुंबई - 'बंगाली ब्युटी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. बिपाशाने आपल्या हॉट आणि ग्लॅमरस भूमिकांनी पडद्यावर मोहिनी घातली होती. सध्या ती अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत आनंदाने आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र, एकेकाळी बॉलिवूडमध्ये बिपाशा आणि अभिनेता जॉन अब्राहमच्या रिलेशनशीपच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. ते दोघे ९ वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र, अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले.
जॉन आणि बिपाशाच्या केमेस्ट्रीची झलक त्यांच्या 'जिस्म' चित्रपटात पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांनाही ही जोडी चांगलीच पसंत पडली होती. या चित्रपटानंतरच त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
हेही वाचा -'मलंग'च्या त्या 'किसींग सीन'बद्दल पाहा काय म्हणाला, आदित्य रॉय कपूर !!