रियॅलिटी शोचा विजेता शिव ठाकरे म्हणतोय 'बी रिअल' आणि ‘स्टे फ्रेश’! - शिव ठाकरे डीयोड्रंट ब्रँड न्यूज
शिव ठाकरे हा मराठी मुलगा रिअॅलिटी शोमुळे रातोरात स्टार झाला. त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्याने आता आपला स्वत:चा डीयोड्रंट ब्रँड आणला आहे.

मुंबई - टेलिव्हिजनवरील रियॅलिटी शोजचे एक वैशिष्ठ म्हणजे यात भाग घेतलेला सामान्य माणूस एका रात्रीत स्टार बनू शकतो. मराठी बिगबॉस सीजन-२मध्ये शिव ठाकरे एक स्पर्धक म्हणून आला होता व संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनला. त्याने मराठी बिगबॉस सीजन २ चे विजेतेपद देखील पटकावले. त्यावेळी सह-स्पर्धक वीणा जगताप बरोबरच्या जवळीकीमुळे तो चर्चेत होता. सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ‘आपला माणूस’ या हॅशटॅगने विशेष ओळखल्या जाणा-या शिवने स्वतःच्या ‘बी-रियल’ ब्रँडची घोषणा केली आहे. सोशल मिडिया साईटवर त्याने ‘बी-रियल’चा लोगो शेअर करत, याची माहिती दिली.