मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा वधूचा पोषाख परिधान करुन सज्ज झाली आहे. मात्र तिचा नवरा कोण हे अद्याप ठरलेले नाही. ती आपल्या पेंडींग नवऱ्याची प्रतीक्षा करताना दिसली. सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून याबद्दल तिने लिहिलंय.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात परिणीती क्वारंटाईनमध्ये राहत आहे. दरम्यान एका लग्नाच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचे वधूच्या पोशाखातील फोटो प्रसिध्द झाले आहेत. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.