महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेएनयूतील घटना ह्रदय तोडणारी - कबीर खान - Kabir Khan latest news

जेएनयूमध्ये चेहरा झाकून घुसलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याच्या घटनेचा दिग्दर्शक कबीर खानने तीव्र निषेध केला आहे. याच विद्यापीठात वाढलेल्या कबीर यांना या घटनेमुळे खूप दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले.

Kabir Khan
कबीर खान

By

Published : Jan 7, 2020, 11:14 PM IST


मुंबई - कबीर खान यांचे वडिल जेएनयूमध्ये प्रोफेसर होते. याच परिसरात त्याची वाढ आणि विकास झाला. अलिकडे जेएनयूमध्ये चेहरा झाकून घुसलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याच्या घटनेमुळे दिग्दर्शक कबीर खानला धक्का बसला. ही घटना ह्रदय तोडणारी असल्याचे त्याने म्हटलंय.

कबीर खान

कबीर म्हणाला, ''जे काही जेएनयूमध्ये घडलंय ते ह्रदय तोडणारे आहे. कारण माझी वाढ जेएनयूमध्ये झालीय. माझे वडिल जेएनयूमध्ये प्रोफेसर होते.''

तो पुढे म्हणाला, ''५०-६०लोक जेव्हा काठ्या घेऊन जेएनयूमध्ये घुसले आणि विद्यार्थ्यांना मारु लागले आणि हे आपल्या देशात घडतंय पाहून मला खूप वाईट वाटले.''

जेएनयूमध्ये झालेल्या हिसेंचा विरोध अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजनी केला आहे. सोमवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या आंदोलनात, रिचा चढ्ढा, तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा आणि झोया अख्तर यांनी सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details