मुंबई - नवनवे विषय हाताळणारा दिग्दर्शक अशी रवी जाधव यांची ख्याती आहे. याच परंपरेतला नवा सिनेमा आता येऊ घातलाय 'रंपाट'. लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय यात एका मिश्किल भूमिकेत झळकला आहे.
सिनेमा वेड्या मिथूनची भूमिका अभिनय करतोय. अभिनयाच्या वेडाने झपाटलेला मिथून त्याने प्रभावीपणे दाखवल्याचे टीझरमधून दिसते. दुसरे म्हणजे हा मिथून सोलापूरचा आहे. सोलापूर भाषेचा लहेजा इथे पाहायला मिळतो.