मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन सोमवारी 46 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'केजीएफ चॅप्टर 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. रविनानेही तिच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला असून, त्यात ती लाल साडीमध्ये बसलेली दिसत आहेत.
'केजीएफ चॅप्टर 2'मधील रविना टंडनचा फर्स्ट लूक रिलीज - केजीएफ चॅप्टर -२ मधील रमिका सेन
अभिनेत्री रविना टंडनच्या वाढदिवसानिमित्य 'केजीएफ चॅप्टर 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला आहे.
रविना टंडनचा फर्स्ट लूक
रविनाने लिहिलंय, "केजीएफ चॅप्टर -२ मधील रमिका सेन, केजीएफ टीमने दिलेल्या या भेटीबद्दल खूप खूप धन्यवाद."
याआधी संजय दत्तने चित्रपटामधून आपल्या 'अधीरा' या व्यक्तीरेखेचा लूक शेअर केला होता.