महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Pushpa 2 : 'पुष्पा: द रुल' पहिल्यापेक्षा भव्य असेल, रश्मिकाने दिले वचन - पुष्पा द राइजमध्ये अल्लू अर्जुन

'पुष्पा: द राइज'च्या (Pushpa: The Rise ) यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ( actor Rashmika Mandanna ) तिला मिळालेल्या सर्व प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अ‍ॅक्शन-थ्रिलर सिक्वेलही पहिल्या भागापेक्षा भव्य असणार असल्याचे रश्मिकाने सांगितले.

पुष्पा: द राइज
पुष्पा: द राइज

By

Published : Jan 14, 2022, 2:29 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ( Actor Rashmika Mandanna ) हिने तिच्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की तिच्या तेलुगू चित्रपट 'पुष्पा'चा (Pushpa ) दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा "चांगला आणि मोठा" असेल. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अ‍ॅक्शन-थ्रिलर लाल चंदनाच्या तस्करीच्या ( sandalwood smuggling ) पार्श्वभूमीवर आधारित आहे. तस्कर आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षाची कथा यात पाहायला मिळणार आहे.

17 डिसेंबर रोजी तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतील 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. निर्मात्यांच्या मते या चित्रपटाने जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

एका ट्विटर पोस्टमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ( Actor Rashmika Mandanna ) हिने तिच्या नवीन चित्रपटासाठी मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "पुष्पा' चित्रपटावर तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.. यामुळे आम्हाला अधिक मेहनत करण्याची इच्छा निर्माण होते.. आणि आम्ही तुम्हाला वचन देतो की.. पुष्पा 2 चित्रपट अधिक चांगला आणि भव्य असेल!" इसे मंदान्नाने लिहिले आहे.

'पुष्पा: द राइज'मध्ये अल्लू अर्जुनने आंध्र प्रदेशच्या रायलसीमा प्रदेशातील चंदन तस्कराची भूमिका साकारली आहे. मंदनाने गावातील श्रीवल्ली या मुलीची बूमिका केली आहे. मल्याळम स्टार फहद फासिल याची पुष्पा चित्रपटाच्या अखेरीस एन्ट्री होते. त्याने या चित्रपटात इंस्पेक्टर भंवर सिंग शेखावतची भूमिका जबरदस्त केली आहे. फहद फासिलचा हा पहिलाचा तेलुगु भाषेतील चित्रपट आहे. त्याच्या कामाचे प्रचंड कौतुक होत आहे.

पुष्पा: द राइज हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. Mythri Movie Makers आणि Muttamsetty Media च्या संयुक्त विद्यमाने बनत असलेला चित्रपटाचा दुसरा भाग 'पुष्पा: द रुल' ( Pushpa: The Rule ) मार्चमध्ये फ्लोअरवर जाईल.

हेही वाचा -नवविवाहित विकी आणि कॅटरिनाने साजरी केली पहिली लोहरी, पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details