महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कला आणि राजकारणाच्या सीमा वेगळ्या असाव्या, पाक कलाकारांवरील बंदीवर रणवीरची प्रतिक्रिया

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या निर्णयावर रणवीर म्हणाला, कला आणि राजकारणाच्या सीमा या वेगळ्या असायला हव्यात.

रणवीर सिंग

By

Published : Mar 4, 2019, 11:46 AM IST

मुंबई- दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारीला केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. यानंतर भारत पाक सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे भारतातील अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना आपल्या चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यावर आता रणवीर सिंगची प्रतिक्रिया आली आहे.

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या निर्णयावर रणवीर म्हणाला, कला आणि राजकारणाच्या सीमा या वेगळ्या असायला हव्यात. राजकारणाला देशाच्या सीमा असतात. पण कला किंवा क्रीडा श्रेत्राला या सीमा नसतात. त्यामुळे राजकारणाला कधीही कला किंवा क्रीडा क्षेत्राशी जोडू नये. कला, क्रीडा आणि राजकरण या गोष्टी कायम वेगळ्या ठेवाव्या, असे मत रणवीरने यावेळी व्यक्त केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details