महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'८३ स्कॉड'; रणवीर सिंगने घेतली सचिन तेंडुलकर, सर विविन रिचर्ड यांची भेट - bollywood

रणवीर सिंग '८३' चित्रपटाबाबत फार उत्साही असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भुमिकेत झळकणार आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजय मिळवला होता. याच विजयावर हा चित्रपट आधारित आहे.

'८३ स्कॉड'; रणवीर सिंगने घेतली सचिन तेंडुलकर, सर विविन रिचर्ड यांची भेट

By

Published : Jun 3, 2019, 10:49 AM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्यामध्ये रणवीर सिंगचे स्थान आहे. रणवीरने आत्तापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या छटा दाखवल्या आहेत. सध्या तो त्याच्या आगामी '८३' या चित्रपटाच्या तयारीसाठी लंडनला गेला आहे. यादरम्यान त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि सर विविन रिचर्ड यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रणवीरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो सचिन तेंडुलकरसोबत आणि रिचर्ड विविनसोबत दिलखुलास संवाद साधताना दिसत आहे. या फोटोवर त्याने हॅशटॅग '८३ स्कॉड', असे कॅप्शन दिले आहे.

रणवीर सिंग, सचिन तेंडुलकर
रणवीर सिंग, सचिन तेंडुलकर
रणवीर सिंग, सचिन तेंडुलकर
रणवीर सिंग, सर विविन रिचर्ड
रणवीर सिंग, सर विविन रिचर्ड
रणवीर सिंग, सुनील गावस्कर
रणवीर सिंग, शेन वॉर्न

रणवीर सिंग '८३' चित्रपटाबाबत फार उत्साही असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भुमिकेत झळकणार आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजय मिळवला होता. याच विजयावर हा चित्रपट आधारित आहे.

या चित्रपटासाठी रणवीरसह संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. रणवीरने कपिल देव यांच्याभूमिकेसाठी त्यांच्या घरी दिल्लीला जाऊन १० दिवस प्रशिक्षण घेतले. सरावादरम्यानचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details