मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने काही महिन्यांपूर्वीच स्वत:चं म्यूझिक लेबल सुरू केलं आहे. 'इनक्लिक' असं त्याच्या म्यूझिक लेबलचं नाव आहे. या म्यूझिक लेबलच्या माध्यमातून त्याने आपलं पहिलं गाणंदेखील रिलीज केलं आहे. हे गाणं प्रसिद्ध रॅपर काम भारीने गायलं आहे.
'मोहब्बत' असं या रॅपचं नाव आहे. आपल्या अंदाजात काम भारीने हे रॅप गायलं आहे. आत्तापर्यंत या गाण्याला २ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज आणि २ हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर हे गाणं हिट ठरत आहे.
हेही वाचा -'सुपर ३०', 'बाटला हाऊस'नंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरची करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये वर्णी