मुंबई -बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. 'बॅन्ड बाजा बारात' ते अगदी 'गली बॉय', या चित्रपटातून रणवीरच्या सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. आता लवकरच तो एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. यासाठी 'यश राज फिल्म'सोबत तो पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.
रणवीर सिंग बनणार गुजराती, यश राजच्या चित्रपटासाठी साकारणार भूमिका - deepika padukon
'बॅन्ड बाजा बारात' ते अगदी 'गली बॉय', या चित्रपटातून रणवीरच्या सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. आता लवकरच तो एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे.
'जयेश भाई जोरदार' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा हे करणार आहेत. तर पटकथा दिव्यांग ठक्कर हे करणार आहेत. रणवीरच्या '८३' चित्रपटानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रणवीर सध्या त्याच्या आगामी '८३' या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्व चषकावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात '८३'च्या वर्ल्डकपचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. त्यामुळे रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.