मुंबई - अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अलिकडेच रिलीज झालेल्या गल्ली बॉय चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रविवारी पार पडलेल्या स्टार स्क्रिन अॅवॉर्ड्समध्ये त्यांनी हा अनमोल पुरस्कार स्वीकारला.
झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या गल्ली बॉय चित्रपटातील या दोन्ही गुणी कलाकारांना सर्वोत्कृष्ट कलाकारांचा बहुमान मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरले होते.
रणवीर सिंगच्या अंगभूत उत्साहामुळे त्याला बॉलिवूडचा पॉवरहाऊस म्हटले जाते. त्याला हा बेस्ट एन्टरटेनर कॅटगिरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे रणवीर खूश झाला असून इन्स्टाग्रामवर त्याने आपला पुरस्कार स्वीकारल्यानंतरचा फोटो शेअर केलाय.