मुंबई -सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात सुप्रसिद्ध झालेल्या राणू मंडलच्या आवाजाने सर्वांना भूरळ पाडली आहे. हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटातलं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं राणूच्या आवाजात रेकॉर्ड केल्यानंतर आता पुन्हा एकदा हिमेशच्या एका गाजलेल्या गाण्याला राणूच्या आवाजाचा हटके तडका मिळणार आहे.
राणूचा रेल्वे स्टेशन ते हिमेश रेशमियाचा स्टुडिओपर्यंतचा प्रवास कोणालाही थक्क करणारा असा आहे. 'सपने देखो सपने पूरे होते ही है', या वाक्याप्रमाणेच राणूचे नशीब पालटले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त राणू मंडल हेच नाव चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.