मुंबई -काही दिवसांपासून इंटरनेटवर राणू मंडल हे नाव बरंच चर्चेत आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तिचं नशीब जादुची कांडी फिरवावी, असं पलटलं आहे. राणूला हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटात तिला गायनाची संधी दिली. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता तिचं हेच गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
अखेर इंटरनेट सेंसेशन राणू मंडल - हिमेश रेशमियाच्या आवाजातलं गाणं प्रदर्शित - हॅप्पी, हार्डी अँड हिर
राणूच्या आवाजातील पूर्ण गाणं ऐकण्यासाठी सर्वजण आतुर होते. आता हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या व्हिडिओवर आत्तापर्यंत बरेच लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.
हिमेश रेशमियाचा 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या बऱ्याच सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजातील गाणी पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यातच आता राणूचाही समावेश झाला आहे. राणूच्या आवाजाची जादू सर्वांवर भुरळ घालत आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटांमध्ये गाणं गाण्यासाठी ऑफर्स मिळू लागल्या आहेत.
अलिकडेच तिने 'सिंगींग सुपरस्टार' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी हिमेश रेशमियाने तिचं गाण ऐकलं आणि तिला त्याच्या चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली. तिच्यासोबत गाणं गातानाचा व्हिडिओदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे राणूच्या आवाजातील पूर्ण गाणं ऐकण्यासाठी सर्वजण आतुर होते. आता हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या व्हिडिओवर आत्तापर्यंत बरेच लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.