महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 14, 2019, 5:27 PM IST

ETV Bharat / sitara

'मर्दानी २'चा थरकाप उडवणारा ट्रेलर, पाहा राणीचा दमदार लूक

बलात्कारासारख्या गंभीर विषयावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. मुलींवर होणारे अत्याचार आणि हत्येचा छडा लावण्यासाठी 'मर्दानी' कशाप्रकारे पाऊल उचलते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

'मर्दानी २'चा थरकाप उडवणारा ट्रेलर, पाहा राणीचा दमदार लूक

मुंबई - राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या 'मर्दानी' चित्रपटानंतर आता 'मर्दानी २' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून तुमचाही थरकाप होईल. या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जीचा मर्दानी लूकही लक्ष वेधून घेतो.

'मर्दानी' चित्रपटाच्या यशानंतर 'मर्दानी २'ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. बलात्कारासारख्या गंभीर विषयावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. मुलींवर होणारे अत्याचार आणि हत्येचा छडा लावण्यासाठी 'मर्दानी' कशाप्रकारे पाऊल उचलते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीचीही आतुरता वाढली आहे.

सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, राणीच्या मर्दानी लूकचीही चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details